⚡ ब्रेकिंग News

आरपीआयची ताकद ख्रिश्‍चन समाजालाही मिळावी, यासाठीच ख्रिश्‍चन आघाडीची स्थापना : बाळासाहेब जानराव



ख्रिश्‍चन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आरपीआय ख्रिश्‍चन आघाडी कटिबद्ध : ख्रिस्तोफर राजमनी

पुणे,  : रिपब्लिकन पक्षाची (आरपीआय) विचारधारा आणि सामाजिक न्यायाची चळवळ ख्रिश्‍चन समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, तसेच समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी ख्रिश्‍चन आघाडीची स्थापना करण्यात आल्याची माहिती आरपीआयचे नेते बाळासाहेब जानराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेला आरपीआयचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, नगरसेविका हिमानी कांबळे, आरपीआय ख्रिश्‍चन आघाडीचे अध्यक्ष ख्रिस्तोफर राजमनी तसेच ख्रिश्‍चन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

जानराव म्हणाले, संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आरपीआय सातत्याने संघर्ष करत आहे. या संघर्षात  ख्रिश्‍चन समाजाचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि त्यांच्या प्रश्‍नांना संघटितपणे वाचा फुटावी, हा आघाडी स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समानता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांवर आधारित समाजनिर्मितीसाठी सर्व धर्मीयांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ख्रिश्‍चन आघाडीच्या माध्यमातून समाजातील युवक, महिला आणि विविध घटकांना नेतृत्वाची संधी मिळेल.

ते म्हणाले की, आजही ख्रिश्‍चन समाजातील मोठा वर्ग केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांपासून अनभिज्ञ आहे. माहितीच्या अभावामुळे पात्र असूनही अनेक नागरिक या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. ख्रिश्‍चन आघाडीच्या माध्यमातून समाजातील लोकांपर्यंत सरकारी योजनांची माहिती पोहोचविणे, त्यांना आवश्यक मार्गदर्शन करणे तसेच विविध शासकीय विभागांशी समन्वय साधून योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

ख्रिश्‍चन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आरपीआय ख्रिश्‍चन आघाडी कटिबद्ध : ख्रिस्तोफर राजमनी

ख्रिश्‍चन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी आरपीआय ख्रिश्‍चन आघाडी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन  ख्रिस्तोफर राजमनी यांनी केले. समाजातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने ख्रिश्‍चन समाजाच्या कल्याणासाठी आणि त्यांना विविध शासकीय योजनांशी जोडण्यासाठी स्थापन केलेली आरपीआय ख्रिश्‍चन आघाडी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण बांधिलकीने कार्य करेल, अशी माहिती ख्रिश्‍चन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ख्रिस्टोफर राजमनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ख्रिस्तोफर राजमनी यांनी ख्रिश्‍चन आघाडीच्या पुणे शहर कार्यकारिणीची घोषणा केली. त्यामध्ये डार्थी रॉड्रिक्स थॉमस (महिला अध्यक्षा), येसू जेम्स दोरास्वामी (उपाध्यक्ष), विनोद चंडालिया (ब्रदर) (पुणे कॅम्प विभागाध्यक्ष), फ्रान्सिस सांतामात्यि (हडपसर विभागाध्यक्ष), ओलोसिल प्रगासम (सोलापूर बाजार प्रभाग शाखाध्यक्ष), स्टेनली फ्रान्सिस नेथन (वानवडी शाखाध्यक्ष), विनेश पिल्ले (घोरपडी-मुंडवा प्रभागाध्यक्ष), रॉकी अँथोनी (वानवडी बाजार शाखाध्यक्ष), राजन राजमनी (कोंढवा शाखाध्यक्ष) तसेच रॉबर्ट दास (वडगाव शेरी शाखाध्यक्ष) यांच्यावर विविध पदांची जबाबदारी सोपविण्यात आली.


Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...