⚡ ब्रेकिंग News

अटकेपार झेंडा उपक्रम पुण्यात जल्लोषात साजरा श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले व सरदार घराण्यांचे वारसदार विशेष उपस्थिती

अटकेपार झेंडा उपक्रम पुण्यात जल्लोषात साजरा श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले व सरदार घराण्यांचे वारसदार  विशेष उपस्थिती...  

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या प्रांगणात अटक विजय दिवस (२८ एप्रिल १७५८) अर्थात मराठा साम्राज्य दिन व पेशावर विजय दिवस (८ मे १७५८)  अधोरेखित करणाऱ्या टपाल विशेष आवरणाचे लोकार्पण, शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, शंखनाद, स्वराज्य ते साम्राज्य एक सांगीतिक मानवंदना अशा भरगच्च कार्यक्रमांची पर्वणी_

       


  छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकारी मावळ्यांनी १७ व्या शतकात रायरेश्वर येथे शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले.  त्यानंतर, राजगड, रायगड, जिंजी, सातारा आणि पुणे ह्या हिंदवी स्वराज्याच्या राजधानी म्हणून ओळखल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या उत्तराधीकार्यांनी स्वराज्याचा पुढे अटक ते कटक, तंजावर ते पेशावर असा मराठा साम्राज्यात विस्तार केला. मावळातील रायरेश्वर-राजगड ते खैबर खिंडीतील जमरुद किल्यांपर्यंतचा मराठ्यांचा पराक्रमाचा हा इतिहास सर्वांना प्रेरणादायी आहे. २८ एप्रिल १७५८ रोजी मराठ्यांनी सिंधू नदीच्या तटावरील अटक किल्ला जिंकला, तसेच पुढे ८ मे १७५८ रोजी पेशावर जिंकून घेतले. जनमानसात अटकेपार झेंडा रोवणे म्हणून प्रसिद्ध असलेली ही घटना मराठा साम्राज्याच्या वैभवाचा सर्वोच्च बिंदू मानली जाते. म्हणून या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करण्यासाठी तसेच मराठा साम्राज्याच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या शूर योद्ध्यांच्या अतुलनीय पराक्रमाला वंदन करण्यासाठी, हा असाधारण विजय दिवस ‘अटक विजय दिवस’ अर्थात ‘मराठा साम्रज्य दिवस’ म्हणून ओळखला जावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन बायोस्फिअर्स संस्था, पुणे; दख्खन इतिहास संशोधन संस्था, पुणे; अटकवीर मानाजी पायगुडे सभा; विश्व विक्रमी केशव शंखनाद पथक, पुणे; विविध सेवाभावी संस्था आणि व्यापक स्वरूपात शिव-शंभू प्रेमींच्या सहभागातून आणि हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या शूर-योध्यांच्या वारसदार प्रतिनिधी यांच्या विशेष उपस्थितीत शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी सायं. ६:०० ते ९.००  वा. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पोतदार सभागृहात व प्रांगणात मोठ्या उत्साहात  साजरा करण्याचा आला. याप्रसंगी सन्माननीय मान्यवर म्हणून भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. प्रदीपदादा रावत, सामाजिक कार्यकर्त्या, सातारा (अदालत वाडा) मा. श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले,  जेष्ठ इतिहास संशोधक व भा. इ. सं. मंडळाचे चिटणीस श्री. पांडुरंग बलकवडे, जेष्ठ इतिहास संशोधक व अटकवीर मानाजी पायगुडे सभा, पुणे संस्थापक मा. श्री. अरुण पायगुडे,  इतिहास अभ्यासक व बायोस्फिअर्स चे संस्थापक पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन अनिल पुणेकर, दख्खन इतिहास संशोधन संस्था, पुणे चे अध्यक्ष श्री. मुकुंद पायगुडे; जेष्ठ उद्योजक व झपूर्झाचे संस्थापक श्री. अजित गाडगीळ, सरदार घराण्यांचे वारसदार प्रतिनिधि श्री. समीरदादा जाधवराव, श्री. ऋषिकेश पासलकर, श्री. इंद्रजीत जेधे, श्री. रवींद्र कंक, श्री. सत्यशील ढमाले, श्री. शशी शिंदे, श्री. संदीप बांदल, श्री. धैर्यशील ढमढेरे, श्री. इंद्रजीतसिंह घोरपडे गजेंद्रगडकर, श्री. आनंद खोपडे, श्री. रावसाहेब माने; श्री. कुमार रास्ते; श्री. रविराजे इंगळे, श्री. संजय गोळे, विश्वविक्रमी केशव शंखनाद पथक पुणे चे शंखाचार्य श्री. विजय भापकर देशमुख, श्री. उमेशराव मेहंदळे व इतर मान्यवर उपस्थित होते. शिवाय हा दिवस अधोरेखित करण्यासाठी आणि हि प्रेरणादायी ऐतिहासिक घटना सर्वदूर होण्यासाठी टपाल विभागाच्या माध्यमातून नुकतेच प्रकाशित झालेल्या, या विषया-संदर्भात डॉ. सचिन अनिल पुणेकर संकल्पित व प्रस्ताविक विशेष टपाल आवरणाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याच सोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्वराज्य ते साम्राज्य: मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची शौर्यगाथा-एक सांगीतिक मानवंदना संगीतकार आणि गायक पंडित उदय रामदास, शिवशाहीर, संबळवादक श्री. हरिदास शिंदे आणि सहकारी यांच्या माध्यमातून देण्यात आली. शिवशस्त्रगाथा: ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन शस्त्रसंग्राहक श्री. संतोष चंदने यांच्या माध्यमातून मांडण्यात आले. विश्व विक्रमी केशव शंखनाद पथक, पुणे यांच्या माध्यमातून गुरुवर्य श्री. नितीनदादा महाजन यांच्या पाठींब्याने, श्री. विजय देशमुख व श्रीमती अंजलीताई नगरकर यांच्या माध्यमातून शंखनाद करून अनोखी मानवंदना दिली. याशिवाय हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य हा विशेष लघुपटदेखील प्रसारित करण्यात आला, पारंपरिक वाद्यवंदना अशा विविध भरगच्च कार्यक्रमाची पर्वणी यावेळी होती. सदर उपक्रमात हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी योगदान देणाऱ्या  त्याकाळी असलेली सरदार घराणी, सहकारी मावळे यांचे वारसदार प्रतिनिधी आणि शिवविचारांनी प्रेरित असणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था, शिव-शंभूप्रेमी, संत, इतिहास अभ्यासक-संशोधक, अधिकारी, लोकप्रतिनिधी, साहित्यिक, कलाकार इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. सचिन पुणेकर यांनी केली तर सूत्रसंचालन श्री. ओंकार दिक्षित यांनी केले.


            या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात श्री .रावत यांनी राष्ट्रनिर्माण कार्यामध्ये मराठ्यांनी केलेला पराक्रम व त्यांचे अतुलनीय योगदान आणि हा इतिहास पुढच्या पिढीला निश्चित प्रेरणादायी ठरेल असे अधोरेखित केले. "मराठा साम्राज्याचा 'अटक ते कटक' विस्तार दर्शवणारा नकाशा 'एनसीआरटी' ने पाठ्यपुस्तकातून वगळणे, म्हणजे मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास मिटविण्याचे दुष्कृत्य आहे. नकाशा वगळणे म्हणजे इतिहास नाकारणे आहे," असा आसूड श्रीमंत छत्रपती वृषालीराजे  भोसले यांनी ओढला. इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे म्हणाले," आपल्या दोन हजार वर्षाच्या इतिहासात अटकचा विजय, हा सर्वात देदीप्यमान बिंदू आहे.  मराठे नसते तर दिल्ली आज अफगाणिस्तानची राजधानी असती असे गौरवोद्गार त्यांनी काढले. जेष्ठ इतिहास संशोधक यांनी त्यांच्या संशोधनातील व संकलनातील लाहोर, अटक, पेशावर, जमरूद  किल्ल्यापर्यंतचे मराठ्यांचे शौर्य सचित्र आणि उपलब्ध ऐतिहासिक संसाधनांच्या माध्यमातून अधोरेखित केले. या उपक्रमाचे प्रमुख समन्वयक डॉ . सचिन पुणेकर म्हणाले, "जनमानसात अटकेपार झेंडा रोवणे म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मोहिमेत राघोबादादा पेशवे यांच्या नेतृत्वात गेलेल्या फौजेत मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर, गोपाळ गणेश बर्वे , खंडोजी कदम, बाजी रेठरेकर, केशवराव पानसे इत्यादी प्रमुख सेनानी होते. यांसारख्या वीर योद्ध्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला.  म्हणून या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करण्यासाठी तसेच मराठा साम्राज्याच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या शूर योद्ध्यांच्या अतुलनीय पराक्रमाला वंदन करण्यासाठी, हा असाधारण विजय दिन ‘अटक विजय दिवस अर्थात मराठा साम्राज्य दिन' म्हणून ओळखला जावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते".

                        सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता श्री. शुभम दिघे, श्री. वरद कोळपकर, श्री. तुषार सरोदे, श्री. सुमित दिघे, श्री. शैलेंद्र पटेल, श्री. अमित पुणेकर, श्री. अभिजित भसाळे, श्री. गिरीश गोखले, श्री. केदार कुलकर्णी, श्री. दत्तात्रय गायकवाड, श्री. श्रीनिवास शिंदे, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...