पुणे : वास्तवशास्त्राचे संशोधक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना नुकताच, परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष सागवेकर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मधुकर्णिका सासवडे यांच्या शुभहस्ते , परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार साहित्यिक कट्टा, वास्तवशास्त्र पहिल्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सरचिटणीस योगीराज नाईक, आंतरराष्ट्रीय किर्तीच्या गायिका शलाकाताई गाडगीळ, साहित्य गौरव संस्थेच्या कार्याध्यक्ष मंदाताई नाईक, डाॅ.राजेन्द्र भवाळकर आदि मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे संयोजन पुणे परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघ आणि सांजभेट संस्थेचे निमंत्रक श्रीनिवास तेलंग यांनी केले होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आगामी शताब्दी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने , परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार साहित्य कट्टा स्थापन करुन सुमारे 30 मान्यवर साहित्यिकांचा पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर, परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सागवेकर
यांच्या शुभहस्ते जाहिर सत्कार करण्यात आले.ॲड.संध्याताई देशपांडे, श्रध्दाताई देवळे, वसुधाताई नाईक, डॉ. उत्तमराव मांढरे,डाॅ.राहुल भोसले , नंदकिशोर गावडे, दीपाराणी गोसावी, नीलेखाताई पेंटा, बाबा ठाकूर, सुनंदाताई कुलकर्णी, नीलाताई चित्रे , सुप्रियाताई लिमये आदि
मान्यवर साहित्यिकांना परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार साहित्यिक कट्टा गुण - गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.तसेच जेष्ठ पत्रकार संतोष सागवेकर आणि साहित्यिक मधुकर्णिका सासवडे यांना मधुरंग आंतरराष्ट्रीय माध्यम गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.योगीराज नाईक यांना राजकीय विश्लेषक म्हणून पुरस्कार देण्यात आला.याच सोहळ्यात संशोधक डाॅ.मधुसूदन घाणेकर याचे 'वास्तवशास्त्र' पुस्तक तसेच डाॅ .घाणेकर संपादित डहाळी अनियतकालिकाच्या 1141 व्या विशेषंकाचे प्रकाशन मंदाताई नाईक, पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सागवेकर व प्रदेशाध्यक्ष मधुकर्णिका सासवडे यांच्या शुभहस्ते करण्यात करण्यात आले.
अखिल भारतीय भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शताब्दी वर्ष 2027 निमित्त आगामी काळात आग्रा तसेच पंजाबमधे व महाराष्ट्रातील विविध भागात विशेष पत्रकार साहित्य संमेलने आयोजित करण्यात येणार असल्याचे संस्थापक-अध्यक्ष सागवेकर यांनी समारोपात सांगितले.
"प्रत्येकाने सभोवतालच्या विश्वाकडे सकारात्मकतेने सौंदर्य दृष्टी ठेवल्यास प्रत्येकास आयुष्य सार्थक ठरल्याची अनुभूति मिळेल ज्ञानेश्वर माऊलींची विश्वकल्याणाची संकल्पना , तुकोबाचे अभंग,रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आचरणात आणावेत "असे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी आपल्या प्रमुख भाषणात प्रतिपादन केले. मधुकर्णिका सासवडे यांच्या छत्रपती शिवराय यांच्यावरील एक कविता सादर करुन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment