⚡ ब्रेकिंग News

गदिमा आणि बाबूजींच्या अजरामर ‘गीत रामायण’ या कार्यक्रमाचे आयोजन

 


पुणे नेत्रतज्ज्ञ संघटनेतर्फे नेत्रदान पंधरवड्यानिमित्त यंदा एक अतिशय अनोखा आणि अर्थपूर्ण सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गदिमा आणि बाबूजींच्या अजरामर ‘गीत रामायण’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२, एम.ई.एस. बाल शिक्षण मंदिर शाळेचे सभागृह, मयूर कॉलनी, पुणे येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे तिकीट शुल्क रु. ५००/- आहे. या कार्यक्रमाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे डॉ. भक्ती दातार यांच्यासोबत आमचे दोन नेत्रदिव्यांग कलाकार मित्र कविता भंडारे आणि अद्वैत मराठे हे ‘गीत रामायण’मधील गीते सादर करणार आहेत.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीतून जमा होणारा सर्व निधी अमरावती येथील ब्रेल प्रिंटिंग प्रेसला देणगी म्हणून दिला जाणार आहे.

आजवर नेत्रदिव्यांग व्यक्तींकडे अनेकदा मदतीचे किंवा देणगीचे लाभार्थी म्हणून पाहिले गेले आहे. मात्र या उपक्रमातून नेत्रदिव्यांग कलाकार स्वतःची कला सादर करून समाजासाठी देणगी उभी करणार आहेत. त्यामुळे हा केवळ सांगीतिक कार्यक्रम न राहता, ‘देणगी स्वीकारणाऱ्यांकडून देणगी देणाऱ्यांकडे’ या भूमिकेतील सकारात्मक बदल अधोरेखित करणारा एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम ठरणार आहे.

ह्या कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना पुणे नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ समीर दातार यांची असून कार्यक्रमाचे निवेदन देखील ते स्वतःच करणार आहेत. या कार्यक्रमाची तिकिटे Book My Show वर उपलब्ध आहेत.

ह्या कार्यक्रमाला, मेळघाटच्या आदिवासी पट्ट्यामध्ये आदिवासींकरिता निस्वार्थ काम करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे उपस्थित राहणार असून त्यांच्या करवी ही देणगी दिली जाणार आहे.

तसेच सर्व रसिकांनी तिकीट खरेदी करून कार्यक्रमाला उपस्थित राहावे, या कलाकारांना प्रोत्साहन द्यावे आणि ब्रेल साहित्यनिर्मितीसाठीच्या या देणगी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत.

आपली उपस्थिती म्हणजे केवळ एका कार्यक्रमाला दाद नव्हे, तर नेत्रदिव्यांग कलाकारांच्या कर्तृत्वाला सलाम आणि त्यांच्या हातून घडणाऱ्या एका सुंदर सामाजिक योगदानाला साथ असेल.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...