आग्रहाचे निमंत्रण.. 23 ऑगस्ट 2026 रोजी पुणे येथे शिवप्रहार संघटनेचा 12 वा वर्धापन दिन साजरा करताना आम्ही समाजातील वंचित,पीडित घटकांसाठी काम करणारे, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात आदर्शवत ठसा उमटवणाऱ्या धुरीणांचा काही मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मान करीत आहोत.
हा सन्मान सोहळा पहिल्या सत्रात संपन्न होईल. दुसऱ्या सत्रात संघटनेच्या वाटचालीबाबत संवाद व त्या अनुषंगाने अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील.
राज्यातील प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे हा सोहळा आयोजित केला आहे. शिवप्रहारचे आमचे काही सहकारी जिद्दीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या सर्वांना मनस्वी धन्यवाद देतो.
आमच्या, शिवप्रहारच्या सर्व समर्थक, हितचिंतक बांधवांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन करीत आहोत.
जय शिवराय! जय महाराष्ट्र!
आपलाच, महेश टेळेपाटील ,
प्रदेश संघटक शिवप्रहार संघटना महाराष्ट्र राज्य तथा संस्थापक, मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान .

.jpeg)
Post a Comment