⚡ ब्रेकिंग News

एक रोल मॉडेल म्हणून आपल्या कामाची नोंद देशपातळीवर केली जाईल असे काम करु - राष्ट्रीय संघटक मा. पारस ओसवाल...

समाजात ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या कोणावर अन्याय - अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी संविधात्मक अधिकाराने न्यायासाठी, अन्यायग्रस्त व्यक्तींच्या तक्रारींचे निवारण करीत त्यांना कायदेशीर न्याय मिळवून देण्याचे काम आपली संघटना पूर्ण ताकदीने करेल असे स्वमान सोशल मानवाधिकार परिषद संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व नूतन ॲडव्होकेट नारायण पोवार म्हणाले.

    बुधवार दिनांक २९/०७/२०२६ गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वमान सोशल मानवाधिकार परिषद संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. नारायण पोवार यांनी वकील पदवी प्राप्त केल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार राष्ट्रीय संघटक मा. पारस ओसवाल यांचे हस्ते संघटनेच्या न्यु शाहुपुरी येथील ऑफिसमध्ये करण्यात आला. 

      यावेळी बोलतांना भराष्ट्रीय संघटक पारस ओसवाल म्हणाले की, आज अशा संघटनांची समाजाला गरज आहे. आपण संविधानाने दिलेल्या चौकटीत राहून मानवाच्या संविधानात्मक अधिकारासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करुया. कोल्हापुरातील आंदोलन असो वा एखादे सार्वजनिक सामाजिक काम असो त्याचा देशपातळीवर विचार केला जातो. अशाप्रकारे एक रोल मॉडेल म्हणून आपल्या संघटनेचे काम करु की, आपल्या कामाची नोंद देशपातळीवर केली जाईल.

     गावातील स्मशानभूमी परिसराची स्वच्छता असो, विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठीचा यशस्वी लढा असो. अथवा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या माध्यमातून उठवलेला आवाज असो नेहमी अन्याया विरुद्ध आवाज उठवणाऱ्या नारायण पोवार यांनी वकील पदवी संपादन केल्याने त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांना या पदवीचा फार मोठा आधार मिळणार आहे. अशा राष्ट्रीय उपाध्यक्षांचा यावेळी वकील पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

     यावेळी महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ पूनम मोरे मॅडम यांनी अन्याय ग्रस्तांनी आपल्याला योग्य न्याय मिळण्यासाठी आपल्या संघटनेचे कार्यालय सि. स. न. ३०००/ ए., ई. वॉर्ड, तेज यंत्र एन्टरप्रायझेस, ‌तिसरा मजला, बेकर गल्ली, दाभोलकर कॉर्नर शेजारी, न्यु शाहूपुरी, कोल्हापूर - ४१६००६ येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

     यावेळी राष्ट्रीय संघटक मा. पारस ओसवाल यांचे स्वागत कोल्हापूर व गोवा राज्य कार्याध्यक्ष उदय चौगले यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ पूनम मोरे मॅडम, पश्चिम महाराष्ट्र महिला कार्याध्यक्षा सौ. लता पाटील मॅडम, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजकुमार पाटील, सुजित जाधव,  मधुकर काशिद, दशरथ बागडी, रामचंद्र हरणे, उमेश शिंदे, अनिल कुंभार (पूणे), सुनील दादा (आर्मी रिटायर) आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...