⚡ ब्रेकिंग News

एमआयटी डब्ल्यूपीयूच्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलतर्फे विद्यार्थ्यांसाठी पहिल्या आंतरराष्ट्रीय स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे आयोजन

 






१० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत फिल्म सादरीकरणाचे आवाहन

पुणे , दि. ४ सप्टेंबर : फिल्म स्कूल्समधील उद्योन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल तर्फे फक्त विद्यार्थ्यांनसाठी पहिल्या स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या कॅम्पसमध्ये होईल. ज्या विद्यार्थ्यांना यात सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्वी आपला चित्रपट सादर करावा. असे आवाहन चित्रपट महोत्सव समितीचे अध्यक्ष, प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलचे क्रिएटिव्ह डायरेक्टर अभिजित पानसे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. याप्रसंगी स्टुफीच्या (STUFFI) अधिकृत वेबसाईट चे अनावरण मान्यवरांच्या करण्यात आले. यावेळी महोत्सावाचे संचालक व ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ आणि नामांकित चित्रपट समीक्षक अशोक राणे, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलचे  प्रोग्रॅम डायरेक्टर डॉ.अरूण प्रकाश, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलच्या डायरेक्टर डॉ.स्नेहा समद्दर आणि फिल्म फेस्टिवलचे प्रोग्रॅम हेड मंगेश मर्ढेकर उपस्थित होते.

अभिजित पानसे यांनी सांगितले की, सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन ट्रॉफी, प्रमाणपत्र, सुवर्ण पदक आणि १ लाख रुपये रोख देण्यात येणार आहे. त्याच बरोबर विविध विभागात पुरस्कार देण्यात येणार आहे. महोत्सावात चित्रपट सादरीकरणासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. यात सहभागी होण्यासाठी चित्रपटाची निर्मिती १ नोव्हेंबर २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालाधातील असावी. ३१ जानेवारी २०२७ रोजी चित्रपट दिग्दर्शकाचे वय १८ ते ३० वर्षाच्या दरम्यान असावे. चित्रपट सादर करण्यास १० सप्टेंबर रोजी सुरूवात होईल. निवडीसाठी अर्जदाराला चित्रपटाची ऑनलाइन प्रिव्ह्यू लिंक सादर करावी लागेल. सर्व चित्रपटांचा कालावधी जास्तीत जास्त २० मिनिटांची असावा.

अशोक राणे यांनी सांगितले की, महोत्सावात फिल्म स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा (लघुपट- कथाप्रधान/फिक्शन), तरुण चित्रपट निर्मात्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा (लघुपट- कथाप्रधान/फिक्शन), फिल्म स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा (लघुपट- माहितीपट/ नॉन-फिक्शन), आंतरराष्ट्रीय स्पर्धा (लघुपट- एआय/एआय सहाय्यित),आंतरराष्ट्रीय स्पर्धा (म्युझिक व्हिडिओ), फिल्म स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्पर्धा (लघुपट- कथाप्रधान/फिक्शन), ५मिनिटांच्या चित्रपटांची आंतरराष्ट्रीय स्पर्धा, विशेष स्क्रीनिंग शॉर्टस टू लेजेंड्स, विशेष स्क्रीनिंग उद्घाटनपर चित्रपट आणि विशेष स्क्रीनिंग समारोपपर चित्रपट असेल. तसेच प्रत्येक विभागाचे नियम व अटीं संदर्भात अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

डॉ.स्नेहा समद्दर यांनी सांगितले की, हा महोत्सव केवळ चित्रपट प्रदर्शनापुरते मर्यादिन न राहता स्टुफी मास्टरक्लास, कार्यशाळा, परिसंवाद , फिल्म पिचिंग सत्रे, नेटवर्किंग सत्रे आणि संशोधन सादरीकरणे या द्वारे एक शैक्षणिक परिसंस्था म्हणून कार्य करेल. हा उपक्रम आंतरविद्याशाखीय शिक्षण, अनुभवाधिष्ठित शिक्षण, सर्जनशीलता, उद्योजकता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देऊन भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत ठरतो.

मंगेश मर्ढेकर यांनी सांगितले की,  प्रत्येक स्पर्धा विभागात पारितोषिके ठेवण्यात आले आहे. ज्यामध्ये सर्वोत्तम चित्रपटासाठी सुवर्ण पदक, प्रमाणपत्र आणि १ लाख रुपये रोख(दिग्दर्शक आणि निर्माता/ फिल्म स्कूल यांच्यात समान वाटप), सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम पटकथा, सर्वोत्तम छायाचित्रण (सिनेमॅटोग्राफी), सर्वोत्तम संकलन एडिटिंग, ध्वनी संयोजन, माहितीपट, मेकअप, वेशभूषा, नृत्यदिग्दर्शन बरोबरच सर्वोत्तम अभिनेता (पुरूष), सर्वोत्तम अभिनेत्री (स्त्री), सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता (पुरूष), सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री (स्त्री), सर्वोत्तम निर्मिती डिझाइन (प्रोडक्शन डिझाइन), सर्वोत्तम शाळा/ महाविद्यालय पुरस्कार, सर्वोत्तम प्रायोगिक चित्रपट, सर्वोत्तम चित्रपट पुरस्कारा व्यतिरिक्त  पुरस्कारांमध्ये रौप्य चषक, प्रमाणपत्र, रौप्य पदक यांचा समावेश आहे. तसेच प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार हा सर्व विभागांमधील अशा एका चित्रपटाला दिला जाईल ज्याला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती दिली असेल.

डॉ.अरूण प्रकाश यांनी सांगितले की, चित्रपट प्रदर्शनांव्यतिरिक्त विद्यार्थी आणि प्रतिनिधींसठी शैक्षणिक पैलूंवर लक्ष केंद्रित करणारे उत्कृष्ट पूरक कार्यक्रम असतील. मास्टरक्लासेस मध्ये प्रख्यात चित्रपट निर्माते किंवा तंत्रज्ञ (छायाचित्रणकार, संकलन,ध्वनी संयोजक, संगीत दिग्दर्शक इत्यादी), यांच्या द्वारे घेतले जातील. तसेच परिसंवादात चित्रपट निर्मिती, फिल्म प्रॉडक्शन, वितरण इत्यादींशी संबंधित दृश्ये, छायाचित्रे, या परिसंवादांमध्ये प्रख्यात चित्रपट निर्माते, किंवा, संपादक, ध्वचनी रचनाकार, संगीत दिग्दर्शक इ. वक्ते म्हणून सहभागी होतील.

परिसंवादानंतर उपस्थितांशी खुली चर्चा केली जाईल. या संदर्भात अधिक माहितीसाठी email: office@stuffi.in  आणि Website: stuffi.in  वर संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...