पुणे, 29 ऑगस्ट 2026 : एमआयटी पुणे टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर (MIT-TBI) च्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नवउद्योजक आणि नवीन तंत्रज्ञानाधारित स्टार्टअप्सना गेल्या 10 वर्षांपासून प्रोत्साहन दिल्या जात आहे.
याच अथक परिश्रमातून आणि स्टार्टअप्सच्या नवकल्पानातून सध्यस्थित २० यशस्वी स्टार्टअप्स पुढे आलेले आहेत. अशी माहिती एमआयटी पुणे टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटरचे संचालक प्रा. प्रकाश जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी साहिल नहार (ईरगण टेक्नोवेशन), सार्थवाह भोंगडे (अॅक्सी सोल्युशन्स), ऋचा रोकडे (सांटे फूड), आर्या कदम (फिनट्रेस्ट) व मित मालपाणी (रेअरमिंट) उपस्थित होते.
प्रा. प्रकाश जोशी यांनी सांगितले की, MIT-TBI सेंटर मधील यशस्वी स्टार्टअप्समध्ये अर्गेन टेक्नोव्हेशन
(Ergen Technovation) चे संस्थापक साहिल नाहर आहेत. यांच्या कल्पनेतून फास्ट EV चार्जिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. यांना Electronics For You (EFY) Pune Auto R&D Awards 2026 मध्ये पुरस्कार मिळाला आहे.
अक्सी सोल्युशन्स ( Akxy Solutions) चे संस्थापक सार्थवाह भोंडगे आहेत. यांनी स्मार्ट होम कंपोस्टिंग प्रणाली विकसित केली आहे. यांना deAsra Foundation कडून Entrepreneur Excellence Award 2026 मिळाला आहे.
श्रीधा ग्रीन सोल्युशन्स (Shreedha Green Solutions) चे बलवंत ढगे यांनी पर्यावरणपूरक पुनर्वापर करता येणाऱ्या खादी नॅपकिन्सची निर्मिती केली आहे. National Entrepreneurship Award 2019 आणि JRD Tata Social Innovation Award 2020 मिळाला आहे.
बुस्ट माय चाइल्ड (Boost My Child) हे शाळेच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे.
सांटे फूड्स ( Sante Foods) आरोग्यदायी डार्क चॉकलेट्स निर्माण केले आहे. Maha60 Program अंतर्गत Top 60 Startups मध्ये निवड झाली. रुतुरास फूड ( Ruturas Food) फूड आणि कन्झ्युमर प्रॉडक्ट्स क्षेत्रात आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या नवकल्पनांवर कार्यरत आहे.
प्रॉक्सी फार्मा प्रा. लि. (Proxi Farma Pvt. Ltd.) चे संस्थापक डॉ. मधुर मोटवानी आहे. यांच्या नेतृत्वाखाली वनस्पती-आधारित पोषण उत्पादने विकसित केली जातात. DPIIT, भारत सरकारच्या Food & Beverage Trailblazer Category अंतर्गत National Startup Award प्राप्त.
स्केलिक्स इंडस्ट्रीज (Skalix Industries) बायो सोल्वेंट भर देत विशेष रसायनांच्या उत्पादन क्षेत्रात कार्यरत असून देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देत आहे. क्रेसा ग्रीन टेक (Cresa Green Tech) जैवविघटनशील सॅनिटरी उत्पादने विकसित करणारी कंपनी असून तिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
अल्कलाइन (Alkaline) हे नवोन्मेषाधारित उत्पादन क्षेत्रात कार्यरत असून अल्कलाइन वॉटर मशीन विकसित केल्या आहेत. यांना Excellence Award प्राप्त झाला आहे व यावर अधिक संशोधन चालू आहे.
फिनट्रेस्ट एज्युकेशन (Fyntrest Education) EdTech आणि FinTech यामध्ये कार्यरत असून आर्थिक शिक्षणाची विशेष पुस्तके विकसित करत आहेत. रेरीमीट (Raremint ) दैनंदिन वापरासाठी प्रीमियम बांबू व सुती (कॉटन) पासून सॉक्स बनवत आहेत. यासाठी हा स्टार्टअप विशेष ओळखला जातो.
भारताच्या स्टार्टअप सेक्टरच्या बळकटीकरणात एमआयटी पुणे टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. इन्क्युबेशन सेंटरने सक्षम आणि गतिमान सेंटर म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. हे सेंटर १२ हजार स्क्वेअर फुट जागेत आहे . येथे २७ पेक्षा जास्त मार्गदर्शकाच्या माध्यमातून स्टार्टअप्सना मार्गदर्शन, धोरणात्मक सल्ला, निधी सहाय्य, पायाभूत सुविधा, नेटवर्किंग आणि उद्योग क्षेत्राशी संपर्क अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे, नव्या कल्पनांचे शाश्वत व्यवसायांमध्ये रूपांतर करण्यासाठी एमआयटी टीबीआय उद्योजकांना आवश्यक असे पाठबळ देते.
इन्क्युबेशन सेंटरच्या पायाभूत सुविधांचा वापर करून अनुभवी उद्योग व्यावसायिक, व्यावसायिक, मार्गदर्शक आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या सहकार्यामुळे एमआयटी टीबीआय नव -उद्योजकांना त्यांच्या कल्पना विकसित करणे, त्यांची व्यावसायिक क्षमता वाढवणे आणि व्यवसायाचा विस्तार करणे यासाठी एक सक्षम पर्याय उपलब्ध करून देत आहे.
उद्योजकांचा वाढता समुदाय निर्माण करत, एमआयटी टीबीआय अधिकाधिक स्टार्टअप्सना घडविणे, उद्योजकांना सक्षम करणे आणि समाज व अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम घडविणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पनांना पाठबळ देत राहणार आहे.
अधिक माहितीसाठी स्टार्टअप्सनी info@mittbi.org येथे संपर्क करावा.

Post a Comment