प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून आयोजित केला जात आहे. सायकलचे शहर अशी पुण्याची ओळख आहे. सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. यंदाच्या सायकल रॅलीतही सहा हजारांहून अधिक सायकलस्वारांनी सहभाग सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. त्या पुढे म्हणाल्या, “ही रॅली केवळ सायकल चालविण्याचा कार्यक्रम नसून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यजागृतीचा संदेश देणारा उपक्रम आहे. नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या चळवळीला बळ द्यावे.”
सायकल रॅलीचा मार्ग :
प्रारंभ : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
सांगता : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे.
मार्ग : कर्वे रोड - गुडलक चौक मार्गे वळून डेक्कन जिमखाना बस स्टॉप, छत्रपती संभाजी महाराज
पुतळा, खंडोजी बाबा चौक, सावरकर स्मारक मार्गे कर्वेरोड मार्गे परत
फॅमेली वॉकेथॉन / चालणे (वॉकिंग / रनिंग):
प्रारंभ : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
सांगता : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
मार्ग : कर्वे रोड – नळ स्टॉप वळण कर्वे रोड मार्गे परत


Post a Comment