⚡ ब्रेकिंग News

तालुक्याच्या विकास प्रश्नावर सर्व शिवसैनिकांनी एकत्र यावे मंत्री भरत शेठ गोगावले यांचे शिवसैनिकांना आदेश...

 


दि.11,8.2026  रोजी मुंबई मंत्रालय या ठिकाणी सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे तसेच अकलूज शहर प्रमुख महेश पवार आपल्या शिष्टमंडळा बरोबर मुंबईला गेले होते. कर्तव्यदक्ष मंत्री भरत शेठ गोगावले यांची भेट घेतली माळशिरस तालुक्याच्या विकास प्रश्नावर दादासाहेब लोखंडे यांनी शेतकरी तसेच कष्टकरी यांच्या विकास प्रश्नावर कामे उपस्थित केली असता माळशिरस तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन तालुक्यांमध्ये ज्या ठिकाणी विकास नाही त्या ठिकाणचे आढावे द्या तेथील शंभर टक्के कामे करण्याचे आश्वासन रोजगार हमी तसेच फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांनी दिले.

शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे यांना भेटले असता दादासाहेब लोखंडे यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा अभाव असल्याने व त्या ठिकाणी शाळेमध्ये पट वाढला पाहिजे त्यासाठी जिल्हा निहाय समिती नेमून प्रत्येक तीन महिन्याला गुणवत्ता तपासावी म्हणून प्रयत्न करावे या प्रश्नावर मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ प्रयत्न सुरू करू विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकार कटीबद्ध आहे.

सरकारी शाळा असो अथवा खाजगी शाळा असो नियम बाह्य शाळांचे गय केले जाणार नाही त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर लक्ष ठेवा अशा संवेदनशील प्रश्नावर शिवसैनिकांनी आपल्या जवळच्या जिल्हा परिषद शाळेला सहकार्य करा असे आव्हान शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले आहे. 

माळशिरस तालुक्यामधील आनंद नगर ग्रामपंचायत या ठिकाणी मशानभूमी दुरुस्ती तसेच अंतर्गत गाव रस्ते, गटारी, विद्युतीकरण, पाण्याचे हात पंप, आनंद नगर ग्रामपंचायत अंतर्गत येणारी सर्व गावे व त्या ठिकाणी प्रलंबित असलेली विकास कामे यावर जवळपास पाच ते सहा कोटी रुपये निधीचा प्रस्ताव मंत्री योगेश कदम साहेब यांना देण्यात आला तात्काळ सर्व कामे मंजूर करणार असल्याचे व तात्काळ निधी देण्याचे आश्वासन मंत्री योगेश कदम यांनी दिले आहे त्यामुळे आनंदनगर ग्रामपंचायतला समाधानकारक निधी मिळून गावाचा विकास चांगल्या प्रकारे होणार असल्याचे दादासाहेब लोखंडे यांनी सांगितले आहे. सदरचा प्रस्ताव हा डेपोटी सरपंच कोमल गोविंद माने यांच्या मागणीवरून मंत्री योगेश कदम यांना देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री संवेदनशील नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मंत्री भरत शेठ गोगावले साहेब यांच्या आदेशाचे पालन करून माळशिरस तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी तालुक्याच्या विकास प्रश्नावर एकत्र येण्याचे आवाहन केल्याने आपापसातील हेवेदावे बाजूला सारून शिव, बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर, लहुजी, अण्णाभाऊ साठे, उमाजी, सर्व विचाराचा वारसा घेऊन पुरोगामी विचार जपणारी सर्वांना बरोबर घेऊन विकासाचा दृष्टिकोन ठेवणारी आपली शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे वंदनीय आनंद दिघे यांच्या विचारावर काम करत असल्याने आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक गावाचा विकास करावा . सदरचे निवेदन देताना उपस्थित अल्पसंख्याक अकलूज शहर प्रमुख सुरज मुलानी तसेच अक्षय प्रभाळे, नितीन भडंगे आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

या आदेशाचे पालन करून माळशिरस तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी दि.16 ऑगस्ट रोजी गाव कारुडे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी सकाळी अकरा वाजता सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...