पुरंदर तालुक्यातील वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून वेगाने बाहेर पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची उत्सुकता दिसून येत आहे. दरम्यान, धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाले असून, पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहायला मिळत आहे.
पावसाचा जोर आणि धरणातील वाढता पाणीसाठा लक्षात घेता प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, अ
से आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment