Baramati By Election Sunetra Pawar Wins: बारामतीत सुनेत्रा पवारांचा 218000 मतांनी ऐतिहासिक विजय; रचला नवा इतिहास

 बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Wins) यांनी अभूतपूर्व आणि विक्रमी विजय संपादन करत बारामतीच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. तब्बल 2 लाख 18 हजार मतांच्या प्रचंड आघाडीने विजय मिळवत त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.


जेएनएन, बारामती. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी अभूतपूर्व आणि विक्रमी विजय (Sunetra Pawar Wins) संपादन करत बारामतीच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. तब्बल 2 लाख 18 हजार मतांच्या प्रचंड आघाडीने विजय मिळवत त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विजयामुळे बारामतीसह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पवार कुटुंबाच्या राजकीय बालेकिल्ल्यात सुनेत्रा पवारांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

सुनेत्रा पवार 218000 मतांनी विजयी (Sunetra Pawar Wins)

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीनंतर त्यांची मतांची आघाडी वाढत गेली आणि अखेर अंतिम निकालात त्यांनी तब्बल 2 लाख 18 हजार मतांची विक्रमी आघाडी नोंदवत प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवला. या निकालाने यापूर्वीचे सर्व विजयाचे विक्रम मागे पडले आहेत.

सुनेत्रा पवार समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात

बारामतीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतमोजणी पार पडली. निकाल स्पष्ट होताच मतमोजणी केंद्राबाहेर सुनेत्रा पवार समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात केली. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. समर्थकांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा केला. 

राजकीय विश्लेषकांच्या मते, हा विजय केवळ बारामतीपुरता मर्यादित नसून राज्याच्या राजकारणातील आगामी समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. बारामतीसारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मतदारसंघात इतक्या मोठ्या फरकाने मिळालेला विजय हा सुनेत्रा पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठा टप्पा मानला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...