मौजे ,अकलूज नगरपरिषद हद्दीतील गट नंबर 84/6/2 पैकी क्षेत्र 0 हे. 56 आर जागा वर्ग दोन ही सरकारी पड जमीन शर्तभग झाली आहे. महसूल विभागाच्या भविष्यकालीन योजना साठी राखून ठेवण्यात आलेले आहे. असे असताना महसूल प्रशासनाची जागा अकलूज उपजिल्हा रुग्णालयास देण्यात आले आहे.
गेली 14 वर्षापासून ही जागा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी मिळावी म्हणून आंदोलने उपोषणे केली आहेत. मागासवर्गीयाच्या विषयाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे आणि उपजिल्हा रुग्णालय सध्या प्रशस्त अवस्थेमध्ये असताना काही कारण नसताना श्रेणीवर्धन 100 खटांचे रुग्णालयास मंजुरी देण्यात आली आहे हा चिंतेचा विषय आहे.
सरकारी पड 56 आर जमीन महसूल प्रशासनाची आहे. माळशिरस तालुक्यामध्ये महसूल प्रशासनाचे सर्व कार्यालय आहेत सध्या तर त्यांना गरज वाटत नाही. माननीय महसूल मंत्री माननीय श्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब आणि सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाठ यांनी मागासवर्गीय विद्यार्थी ची दया करून ही सरकारी जमीन अकलूज या ठिकाणी आहे.
शाळा, कॉलेज, आयटीआय, नरसिंग,कला, क्रीडा विद्यार्थ्यांच्या सोयीची आणि जवळ असल्यामुळे ही जागा महसूल प्रशासनाने समाज कल्याण यांना विकत द्यावी आणि समाज कल्याण यांनी मुलींचे वेगळे आणि मुलांचे वेगळे वस्तीग्रह बांधकाम करावे आणि गेली तीस वर्षापासून प्रलंबित असल्याने सदरचे निवेदन भारतीय दलित महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच शिवसेनेचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे तसेच सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाठ यांना उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या द्वारे देण्यात आले आहे. अकलूज शहरामध्ये सरकारी नियोजित जागा कुठेही शिल्लक नसल्यामुळे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करावा.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय श्री प्रकाशजी अबिटकर साहेब यांनी उपजिल्हा रुग्णालयाला श्रेणीवर्धण 100 खाटचे रुग्णालयास दिलेली मंजुरी तात्काळ रद्द करावी. अन्यथा दिनांक रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी दि.26.10.2026 रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण करणार असे निवेदनात म्हटले आहे उपस्थित गणेश खंडागळे दिगंबर साठे होते




Post a Comment