⚡ ब्रेकिंग News

प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने उभे रहावे - बाळासाहेब बोराटे


पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने खेड पोलिसांचा सत्कार

पिंपरी, पुणे (दि. २८ जून २०२६) खेड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्या कर्तव्यात तत्परता दाखविणाऱ्या प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने उभे रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे यांनी केले. 

चांडोली, तालुका खेड राजगुरुनगर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक ज्ञानेश्वर मारुती मरगज यांच्या रस्त्यावर लावलेल्या ट्रक मधील डिझेलची चोरी झाली. त्याची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तक्रारीनुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही द्वारे तपास सुरू करून आरोपीला अल्पावधीत जेरबंद केले. या निमित्ताने खेड पोलीस ठाण्यातील  अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे आणि कार्याध्यक्ष दीपक कलापुरे यांच्या मार्गदर्शनात उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे, सचिव अरुण काळे, कार्यकारणी सदस्य भाऊसाहेब घोमाल, इरफान पठाण आणि देवदत्त रावल व इतर सभासदांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

 या तपासात पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली खेड उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, खेड पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद क्षीरसागर, पोलीस हवालदार संतोष घोलप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद बांबदे, पोलीस हवालदार अतुल डेरे, पोलीस अंमलदार निलेश सुपेकर आणि स्वप्नील गाढवे यांनी तत्परता दाखवली आणि आरोपीस जेरबंद केले. 

           ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि बस वाहतूकदारांच्या अडीअडचणीत मदत करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा पुढील काळात देखील गौरव केला जाईल असे बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...