पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला.. मिल्टन कंपनीच्या तज्ञ पदाधिकाऱ्यांनी सोलर विषयाची संपूर्ण माहिती दिली.
– सोलर विषयावरील तांत्रिक माहिती व मार्गदर्शन सत्र
• सोलर सिस्टमची संपूर्ण माहिती
• सोलर प्रोजेक्ट्सचे फायदे व संधी
• सोलर क्षेत्रातील व्यवसाय व उत्पन्नाच्या संधी
या सर्व विषयावर त्यांनी सखोल माहिती दिली त्यानंतर उपस्थित नागरिकांनी काही प्रश्न व काही शंका विचारल्या कंपनीच्या पाटील सरानी सर्व प्रश्नाची व्यवस्थित उत्तरे देऊन घरातील ग्राहकांच्या मनातील शंका दूर केल्या...
यावेळी मंगलमूर्ती सोलर अँड इन्फ्रा कंपनीच्या एमडी सौ अमृता सुपेकर यांनी कंपनी विषयी माहिती दिली, मराठा तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल असेही त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा महासंघाचे परदेशी उपाध्यक्ष अनिल ताडगे, ज्येष्ठ विचारवंत जगजीवन काळे ,पुणे महिला शहराध्यक्ष , अध्यक्ष आरती मारणे, जिल्हा उपाध्यक्ष अंजली काळे, दौंड तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, जालिंदर मगरे, पुणे शहर उपाध्यक्ष विनायक मिसाळ व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते मानले. सतीश चव्हाण यांनी आभार मानले .त्यानंतर स्वादिष्ट जेवण घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली....
कार्यक्रम संपल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रवीण दादा गायकवाड यांनी मंगलमूर्ती सोलर कंपनीच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत कुंजूर उपस्थित होते... प्रकाश सुपेकर व सौ अमृता सुरेखा यांनी त्यांचे शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन स्वागत केले. व सोलर सिस्टिम ची माहिती त्यांना दिली... त्यानंतर प्रवीण दादांनी कंपनीच्या कार्यास आणि पुढील व्यवसायास हार्दिक शुभेच्छा दिल्या...




Post a Comment