⚡ ब्रेकिंग News

गोल्डन अवर्समध्ये विश्वराज हॉस्पिटलची महत्त्वपूर्ण भूमिका... बीआयडीएचे अध्यक्ष धनंजय जामदार यांचे विचार

 








विश्वराज हॉस्पिटलमध्ये ऑडिओमेट्री अँड बेरा डायग्नोसिस सेंटरचे उद्घाटन

लोणी काळभोर, 31 ऑगस्ट: दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी अपघातग्रस्त रुग्णाला गोल्डन अवर्समध्ये योग्य उपचार मिळाले तर त्याचे प्राण वाचू शकतात. बारामती, इंदापूर व कुरकुंभ या भागातील हजारो नागरिकांसाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल हे गोल्डन अवर्सची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल नागरिकांसाठी वरदान ठरले आहे, असे मत बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन (BIDA) चे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी व्यक्त केले.

"विश्वासार्ह सेवा" या तत्त्वाचे पालन करणाऱ्या विश्वराज हॉस्पिटलतर्फे नुकतेच अत्याधुनिक 'ऑडिओमेट्री अँड बेरा डायग्नोसिस सेंटर'चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी हॉस्पिटलचे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. सचिन कटकडे, ऑपरेशन हेड डॉ. संतोष साहू, जीएम डॉ. आशिष कुमार दोशी आणि सेंटरच्या प्रमुख डॉ. मोनिका भगत उपस्थित होत्या.

हा कार्यक्रम एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड आणि संचालिका डॉ. अदिती कराड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

धनंजय जामदार म्हणाले, "बारामती येथील ४० हजार, इंदापूर येथील १५ हजार आणि कुरकुंभ येथील २५ हजार कामगार व या भागातील लाखो नागरिकांसाठी हे हॉस्पिटल जीवनदायी ठरले आहे. येथील अत्याधुनिक वैद्यकीय सेवेमुळे हजारो नागरिकांचे प्राण डॉक्टरांनी वाचवले आहेत."

डॉ. मोनिका भगत म्हणाल्या, "मेंदू आवाजांवर प्रक्रिया कशी करतो हे रहस्य BERA चाचणी उलगडण्यास मदत करते. या चाचणीचे पूर्ण नाव ब्रेनस्टेम ऑडिटरी इव्होक्ड रिस्पॉन्स (Brainstem Auditory Evoked Response) असे आहे. या चाचणीद्वारे टोन, टाळ्या किंवा क्लिक्स यांसारख्या आवाजांवर मेंदू कशी प्रतिक्रिया देतो हे मोजले जाते. जन्मजात श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी BERA टेस्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पाच वर्षांखालील मुलांसाठी सरकारतर्फे विशेष योजना राबवल्या जातात, त्याचा लाभ घेता येतो."

त्यानंतर डॉ. संतोष साहू आणि डॉ. आशिष कुमार दोशी यांनी हॉस्पिटलतर्फे राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...